रविवार दिनांक २३ जानेवारीच्या सूचना

  1. सामान्य काळातील ३ रा रविवार. 
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारणाऱ्या मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी केले. पुढील रविवारी आयोजन व चर्च सफाई फातिमा माता लेन डोंगरी गावपरिवाराचे असेल. पुढील रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी ६ व ७.३० वाजता मराठी मिस्सा व ८.४५ वाजता इंग्रजी मिस्सा असतील.
  3. गुरुवार दिनांक २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पालखाडी चॅपेलमध्ये मिस्सा असेल. 
  4. येत्या शुक्रवारी इरमित्रीवर संध्याकाळी ६ वाजता मिस्सा असेल. आयोजन व सफाई फातिमा माता आनंदनगर गावपरिवाराचे असेल.
  5. आज आपल्या धर्मग्रामातील ३३ मुलामुलींनी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारलेला आहे. त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन.
  6. उद्या सोमवारी संध्याकाळी मिस्सानंतर पवित्र आत्म्याची प्रार्थना असेल.
  7. मंगळवार दिनांक २५ जानेवारी रोजी संत पौलाच्या परिवर्तनाचा सण साजरा केला जाईल.
  8. बुधवार दिनांक २६ जानेवारी, आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. त्यादिवशी सकाळी ६ वाजता पहिली मिस्सा असेल व सकाळी ७ वाजता दुसरी मिस्सा असेल. सकाळी ७ च्या मिस्सानंतर शाळेत झेंडावंदन होईल. त्यादिवशी संध्याकाळी मिस्सा होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
  9. फा. अजित व आपल्या घाट समितीचे काही सदस्य उद्या सोमवारी तामिळनाडूला देवळाचा घाट पाहण्यास व बुक करण्यास जात आहेत. त्यांचा प्रवास व काम चांगल्या प्रकारे व्हावे म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.
  10.   उद्या सोमवारी सकाळी ९.३० वाजता घाट समितीची सभा होईल.
  11. प्रेरणा सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी, भाजीपाला विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाची इ श्रम कार्ड  काढण्याची सुविधा मंगळवार दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या चर्च हॉलमध्ये उपलब्ध असेल. येताना सोबत आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन येणे. कार्डछपाईसाठी फी रु. १००/- मात्र असेल.

Print your tickets