रविवार दिनांक ०६ फेब्रुवारीच्या सूचना

1.       सामान्य काळातील ५ वा रविवार

2.       आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा आरिवर गावपरिवाराने केली. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत इग्नेशियस लोयोला धारावी गावपरिवाराची असेल.

3.       उद्या सोमवारी आपण संत गोन्सालो गार्सिया, आपल्या धर्मप्रांताचा दुसरा आश्रयदाता ह्याचा सण साजरा करीत आहोत.

4.       संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवार आपल्या आश्रयदात्याचा सण मंगळवार दिनांक ८ फेब्रूवारी रोजी साजरा करीत आहेत. त्यादिवशी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांच्या ग्रोटोजवळ मिस्सा असेल. सर्वांना प्रेमाचे आमंत्रण.  

5.       शुक्रवार दिनांक ११ जानेवारी रोजी लुर्ड्स मातेचा सण. त्या दिवशी सकाळी मिस्सा होणार नाही. संध्याकाळी ६ वाजता ग्रोटोजवळ मिस्सा असेल. मिस्साचे आयोजन स्त्रियांची सोड्यालीटी व लिजन ऑफ मेरीचे सभासद करतील.

6.       गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता पालखाडी चॅपेलमध्ये मिस्सा असेल. 

7.       पुढील रविवारी १३ तारखेला आपण फातिमा मातेचा दिवस साजरा करतो. त्यादिवशी सकाळी इथे मुख्य देवळात ७.३० वाजता एकच मिस्सा असेल. संध्याकाळी ६ वाजता ईरमित्रीवर मिस्सा असेल. मिस्साचे आयोजन व सफाई फातिमा माता समाज तलावली गावपरिवाराचे असेल.

8.       बुधवार दिनांक ९ फेब्रूवारी रोजी पॅरिश कौन्सिलची सभा संध्याकाळी ७.३० वाजता मॅक्सि कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात येईल.

9.       सोमवारी संध्याकाळी प्रार्थनेसाठी पाली चर्चचा प्रार्थना संघ येईल.

10.     चर्च व प्रेरणा सेवा केंद्राच्या मार्फत शेतकरी, भाजीपाला विक्रेते, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, रिक्षा चालक व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाची इ श्रम कार्ड काढण्यासाठी मंगळवार दिनांक ८ फेब्रूवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मदत केली जाईल. १९ ते ५९ वयोगटातील कामगारांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा. कार्ड छापण्यासाठी रु. ७० आकारले जातील.

11.     आज सकाळी ७.३० च्या मिस्सानंतर घरकाम करणाऱ्या स्त्रियांची सभा असेल. स्त्रियांनी २०२१ ची युनियन पावती  घेऊन यावे.

12.     धर्मग्राम पाळकीय मंडळ, होली मॅगी चर्च, गोराई मार्फत पहिले ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशन सोमवार दिनांक ७ फेब्रूवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून आयोजित केलेले आहे. सर्वांना आमंत्रण.

Print your tickets