१) सामान्यकाळातील १३ वा रविवार.
२) आज मिस्साचे आयोजन चर्च सफाई सर्व संघटनाचे व मंचाचे पदाधिकाऱ्यांने केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत फ्रॅन्सिस दि असीसी एलकापाडा ह्यांचे असेल.
३) दिनांक ०१/०७/२०२२ महिन्याचा पहिला शुक्रवार असल्या कारणाने त्या दिवशी इरमीत्रिवर मिस्सा होणार नाही. मिस्सा व पवित्र तास संध्याकाळी ६.०० वाजता बेलेन माउली देवळात असेल.
४) आज आपण प्रापंचिकांचा रविवार साजरा करत आहोत कार्डिनल ऑजवल्ड, बिशपांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत व आपल्या कार्यावर आर्शिर्वाद पाठविला आहे.
५) देवळाच्या तलावाचे लिलाव गेल्या रविवारी अनाऊन्स केल्याप्रमाणे बंद पाकिटांद्वारे न होता नेहमीप्रमाणे ओपन खुल्यास्वरुपाचे होते, एकूण ६२,०००/- रुपये पर्यंत लिलाव गेले आहे.
६) येत्या शनिवारी आपले प्रमुख धर्मगुरु फादर ऑस्कर मेन्डोन्सा ह्यांचे पदग्रहण विधी सभारंभ संध्याकाळच्या मिस्सावर मुंबई धर्मप्रांताचे प्रमुख कार्डिनल बिषप ऑजवल्ड ग्रेसीयस ह्यांच्या हस्ते होईल. त्यादिवशी फादरांसाठी खास प्रार्थना करावी. सर्वास मिस्सासाठी आमंत्रण.
७) पालकांनी आपल्या मुलांना संडेस्कूलसाठी व रविवारच्या मुलांच्या मिस्सासाठी पाठवावे.
८) शिक्षणासाठी व मेडिकल खर्चासाठी बरीचशी रिक्वेस्टस/ अप्लिकेशनस येत आहेत. आपल्याकडे त्यांना मदत करण्यासाठी पुरेशे फंड असावे म्हणून आपले कम्युनिटीचे फंड चर्चमध्ये भरण्यासाठी तुम्हास विनंती.
सोमवारी संध्याकाळी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेसाठी पालीचा संघ येणार आहे. कृपया सर्वांनी प्रार्थनेला यावे.