रविवार दिनांक २४ एप्रिलच्या सूचना

  1. पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार देवी दयेचा रविवार
  2. आज चर्च सफाई एसव्हीपीचे सदस्य व दृढीकरणाच्या मुलामुलांनी केली. पुढील रविवारी आयोजन व सफाई सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी गावपरिवाराची असेल.
  3. शुक्रवारी इरमित्रीवर मिस्साचे आयोजन व सफाई संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवाराची असेल,
  4. गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी चॅपेलमध्ये मिस्सा असेल.
  5. आता शनिवार व रविवारच्या मिस्सा नेहमीप्रमाणे असतील.
  6. आज आपल्या धर्मग्रामातील २५ तरुण तरुणींनी दृढीकरण संस्कार स्वीकारलेला आहे त्यांचे अभिनंदन व ख्रिस्तसभेचे परिपूर्ण सभासद म्हणून त्यांचे स्वागत.
  7. पुढील रविवार म्हणजे १ मे पासून रोज संध्याकाळी ग्रोटोजवळ ७ वाजता रोझरीची प्रार्थना असेल. १ भाविकांनी उपस्थित राहावे हि विनंती.
  8. फा. अजित १४ मे पर्यंत चर्च कार्यालयात उपलब्ध नसतील ह्याची कृपया नोंद घ्यावी. फादरांच्या अनुपस्थितीत फा. मायकल चर्चचा कारभार सांभाळतील.
  9. आपल्या विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स शिबीर आयोजित केल्याबद्दल यंग ग्रुप ऑफ डोंगरी तारोडी व प्रेरणा सेवा केंद्राचे मनःपूर्वक आभार.
  1. येत्या रविवार स्व. पास्कोल घर्शी ह्यांच्या वार्षिक स्मृतिदिनाची मिस्सा साजरी केली जाईल.
  2. सोमवारी संध्याकाळी प्रार्थनेसाठी पालीचा प्रार्थनासंघ येणार आहे.

Print your tickets