रविवार दिनांक २० फेब्रुवारीच्या सूचना

  1. सामान्य काळातील ७ वा रविवार.
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई सेंट जॉन बॅप्टिस्ट गावपरिवार तारोडी ह्यांनी केले. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व सफाई बेथलेहेम गावपरिवार, तारोडी ह्यांचे असेल.
  3. शुक्रवारी इरमित्रीवर मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवाराने केली. येत्या शुक्रवारी आयोजन व सफाई वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराचे असेल.
  4. गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता संत फ्रान्सिस झेवियर, पालखाडी चॅपेलमध्ये मिस्सा असेल.
  5. मंगळवार दिनांक २२ फेब्रूवारी रोजी संत पेत्राच्या अधिकाराचा सण, बुधवार दिनांक २३ फेब्रूवारी रोजी संत पॉलीकार्पचा स्मृतिदिन व शुक्रवार दिनांक २५ फेब्रूवारी रोजी धन्यवादित सिस्टर राणी मारियाचा स्मृतिदिन साजरा केला जाईल.
  6. बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता प्रॉपर्टी कमिटीची सभा असेल. शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता इरमित्री कमिटीची सभा असेल. ज्यांनी इरमित्री कमिटीसाठी नावे दिलेली आहेत व ज्यांना ह्या कमिटीवर कार्य करायचे असेल त्यांनी शुक्रवारी कृपया मीटिंगला यावे.
  7. सन्माननीय कार्डिनल साहेबांच्या आदेशानुसार सध्याच्या पॅरिश कौन्सिलचा कार्यकाळ आणखी एका वर्षाने वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्यावर्षी पॅरिश कौन्सिलची निवडणूक होणार नाही.
  8. संत फ्रान्सिस असिसी, एल्कनपाडा आरिवर गावपरिवाराची जनरल सभा मंगळवार दिनांक २२ फेब्रूवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या ग्रोटोजवळ घेण्यात येईल. फादर ह्या सभेला उपस्थित असतील.
  9. गावपरिवारांनी आपापल्या जनरल सभा घेऊन उपवासकाळाची तयारी करावी हि विनंती.
  10. रविवार दिनांक २० मार्च ते शुक्रवार दिनांक २५ मार्चपर्यंत आपल्या पॅरिशमध्ये रिडम्प्टरिस्ट फादर मिशन देतील. त्यादिवसांत कोणी क्रुसाच्या वाटेची भक्ती अथवा अन्य तीर्थयात्रा आयोजित करू नये.
  11. सेंटर फॉर सोशल ऍक्शन व नवजीवन सोशल फाउंडेशनच्या संयुक्त माध्यमाने मिस्सानंतर ट्रायबल लोकांनी बनवलेले विविध सामान व वस्तू विक्रीसाठी चर्च आवारात उपलब्ध असतील. इच्छुकांनी लाभ घ्यावा
  12. गुरुवार दिनांक २४ फेब्रूवारी रोजी मोफत डोळे तसेच डायबेटीस व रक्त तपासणी शिबीर चर्च हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रियेची सोय केली जाईल. गरजूंनी लाभ घ्यावा.
  13. देवळाचा घाट बनवण्याच्या अंतिम टप्प्यात असून १० मार्चपर्यंत आपल्याला घाट मिळण्याची शक्यता आहे.
  14. कृपया सर्वांनी आपला समाज कल्याण निधी वेळेवर भरावा हि विनंती.
  15. पूढील रविवारी सकाळी ७.३० वाजता स्व. जॉन सॅबेस्टियन ग्रेशियस ह्यांच्या वार्षिक स्मृतिदिनाची मिस्सा असेल.   

Print your tickets