रविवार दिनांक १७ जुलैच्या सूचना

१) सामान्यकाळातील १६ वा रविवार.

२) आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता शांतीनगर ह्यांनी केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा ह्यांचे असेल.

३) शुक्रवार दिनांक २२ जुलै २०२२ इरमीत्रीवर मिस्सा असेल मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता तलावली विभाग पालखाडी ह्यांचे असेल.

४) गुरुवार दिनांक २१ जुलै २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता वेलंकनि माता खाडीवर येथे मिस्सा असेल.

५). २६ जुलै संत जोकीम व अन्ना ह्या आईवडील, आजी-आजोबा व धर्म आईवडील हया सर्वांचे आश्रयदाते ह्याच्या सणाचा दिवस. संडेस्कूल पुढच्या रविवारी २४ जुलै आईवडिलांबरोबर मिस्साला येऊन एकत्र वसून मिस्सा अर्पिली जाणार आहे. सहकुटुंबीयांना आर्शिर्वाद दिला जाईल.

६) २६ जुलै ह्या दिवशी विभागात पालकदिन आपल्या आवडी प्रमाणे साजरा करणे.

७) ३१ जुलै रोजी युवक संघटना आयोजित पालकदिन चर्चमध्ये संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत साजरा केला जाईल त्यासाठी सर्वास आमंत्रण आहे मात्र इच्छुकांनी आपले नाव विभाग प्रमुखाकडे घ्यावीत म्हणजे स्नॅक्सची व्यवस्था करण्यास मदत होईल. ह्या प्रोग्रामसाठी देणग्यांचा स्वीकार केला जाईल. इच्छुकांनी फादरांना भेटावे.

८ ) आपल्या पॅरीशमधे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ स्पर्धा चर्च स्कूल पटांगणात कोणत्याही व्यक्तीस /संघास करायचा असेल तर त्यांनी फादरांना कमीत कमी एक महिना अगोदर लेखी कळवून परवाणगी घ्यावी. व हि परवाणगी देताना Sports व Cultural कमिटीचा सहभाग असेल हि कमिटी पॅरीशकांउसील मधून निवडलेली आहे.

९) उद्या/आज इरमित्रीवर दृढीकरन मुले शिक्षक आईवडील व विभाग प्रमुख ८.४५ च्या मिस्सानंतर वृक्षरोपण करणार आहेत. ह्या वृक्षरोपणाच्या प्रोजेक्टद्वारे आपल्या उपस्थितिने दृदीकरणाच्या मुलांना आपण दाखवून देणार आहोत आम्ही तुमच्या आध्यामिकतेच्या प्रवासात बरोबर आहोत.

१०) ज्या कोणाच्या खाचा खाली गेल्यात त्यांनी त्या भरुन घ्याव्यात तसेच कोणीही खाचेवर पावसाळ्यात फुले टाकू नये त्याने खाचेवर चिकटीपणा होते व त्यांवरुन घसरण्याची शकता असते.

११) सोमवारी संध्याकाळच्या मिस्सानंतर कॅरजमॅटीक प्रार्थना असेल.

१२) मागील रविवारचे दान रु. १६,२००/- देवळाला देणगी रुपये १,००,०००/- देणार अनामिक व चार्ली जॉन ग्रेसीयसच्या स्मरणार्थ रुपये १०,०००/- देणार फॅरन व क्लेरन्स चार्ली ग्रेसीयस विन्सन दि. पॉलचे दुसरे दान रुपये ७,७५०/

१३ ) संडेस्कूल मुलांसाठी नास्ता व संडेस्कूल मुलांची पुस्तके स्पॉन्सर करणार श्री. हॅरल्ड जॉर्ज बोर्जिस.

१४) येत्या बुधवारी दिनांक २० जुलै स्वर्गवासी जॉन निकलाव बोर्जिस ह्यांची वर्षाची मिस्सा सकाळी ६ च्या मिस्सावर असेल.

Print your tickets