रविवार दिनांक १५ मेच्या सूचना

  • पुनरुत्थान काळातील ५ वा रविवार.
  • आज मिस्साचे आयोजन व सफाई प्रवासी संघटनेने केली. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व सफाई फातिमा माता लेन डोंगरी गावपरिवाराची असेल, पुढील रविवारी नेहमीप्रमाणे मिस्सा असतील.
  • इरमित्रीवर शुक्रवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराने केली. येत्या शुक्रवारी आयोजन व सफाई बेथलेहेम गावपरिवार तारोडीचे असेल.
  • आज आपल्या धर्मग्रामात युवक संघटनेतर्फे फन फियास्टा आयोजित करण्यात आलेला आहे. दपारी २ वाजल्यापासून विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कार्यक्रमाची सांगता ज्यांनी कुपन्स घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच्या सहभोजनाने होईल. कृपया येऊन ह्या दिवसाचा आनंद घ्यावा.
  • पुढील रविवारी सकाळी ७.३० वाजता स्व. अँजेलिन नुनीस ह्यांच्या वार्षिक स्मृतिदिनाची मिस्सा असेल.

Print your tickets