रविवार दिनांक १९ डिसेंबरच्या सूचना

  1. आगमन काळातील ४ था रविवार
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवाराने केली. येणाऱ्या रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी गावपरिवाराचे असेल.
  3. सोमवारी इरमित्रीवर आयोजन व सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवाराने केली. येत्या शुक्रवारी इरमित्रीवर मिस्सा होणार नाही.
  4. शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता कॅरल सिंगिंग व ११ वाजता ख्रिसमसची मिस्सा असेल. मिस्साचे आयोजन पॅरिश कौंसिलचे सभासद करतील. शनिवारी ख्रिसमसच्या दिवशी सकाळी ८ वाजता एकच मिस्सा असेल. आयोजन लिजन ऑफ मेरी व सोड्यालीटीच्या स्त्रिया करतील. शनिवारी संध्याकाळी मिस्सा होणार नाही.
  5. येत्या रविवारी सकाळी ६ व ७.३० वाजता अश्या दोनच मिस्सा असतील.
  6. मंगळवारी व बुधवारी संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजता आगमन काळातील कुंसारे असतील.
  7. आज सकाळी ८.४५ च्या मिस्सानंतर यंदा प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलामुलींच्या पालकांची सभा असेल.
  8. संत जेरॉम चर्च, काशिमीराचा सण रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी साजरा केला जाईल. सणाची मिस्सा सकाळी ९.३० वाजता असेल. त्याअगोदर सकाळी ६, ७ व ८ वाजता मराठी मिस्सा असतील. भाविकांनी मिस्सा ऑनलाईन बघाव्यात असे आवाहन चर्चकडून करण्यात आलेले आहे. यंदा जत्रा होणार नाही असेही कळविण्यात आलेले आहे.
  9. संत गोन्सालो गार्सिया, कुंभारवाडा गावपरिवाराची जनरल सभा सोमवार दिनांक २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता, सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी गावपरिवाराची जनरल सभा गुरुवार दिनांक २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता असेल. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती ह्या सभेला हजर राहणे गरजेचे आहे.
  10. गुरुवार दिनांक २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजत सेंट फ्रान्सिस झेवियर पालखाडी चॅपेलमध्ये मिस्सा असेल व मिस्सानंतर जनरल सभा असेल.
  11. शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी चर्च कार्यालय बंद राहील.

Print your tickets