१) सामान्यकाळातील १७ वा रविवार.
२) आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा ह्यांनी केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई पॅरीशमधील युवक संघटनाचे ह्यांचे असेल.
३) शुक्रवार दिनांक २९ जुलै २०२२ इरमीत्रीवर मिस्सा असेल मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता तलावली विभाग ह्यांचे असेल.
४) गुरवार दिनांक २८ जुलै २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता संत फ्रान्सिस झेवियर विभाग पालखाडी इथे मिस्सा असेल.
५) २६ जुलै ह्या दिवशी विभागात पालकदिन आपल्या आवडी प्रमाणे साजरा करणे.
६) ३१ जुलै रोजी युवक संघटना आयोजित पालकदिन चर्चमध्ये संध्याकाळी ६ ते ८. वाजेपर्यंत साजरा केला जाईल त्यासाठी सर्वास आमंत्रण आहे मात्र इच्छुकांनी आपले नाव विभाग प्रमुखाकडे घ्यावीत म्हणजे स्नॅक्सची व्यवस्था करण्यास मदत होईल. ह्या प्रोग्ग्यामसाठी देणग्यांचा स्वीकार केला जाईल. इच्छुकांनी फादरांना भेटावे.
७) तारोडी डोंगरी सहकारी संस्था मार्फत २०१९ ते २०२२ वर्षी १० वि १२ वि व १५ विच्या मुलांना चांगले गुण मिळाले असतील त्यांना त्यांच्या मार्कशीट (Result) पाहून स्कॉलरशिप वाटप केली जाणार आहे त्यांची संपूर्ण माहिती नोटीस बोर्डवर लावली आहे.
८) संत विन्सेट डी. पॉल संघटना पाली यंदाच्या वर्षी वसई अंध दुःख निवारक मंडळाचे डोळ्यांचे हॉस्पिटल, वसई ह्यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ ह्या दिवशी आयोजित करणार आहे. त्याची माहिती तोटीचे बोर्डवर लावलेली आहे.
९) गेल्या रविवारी आपल्या दृढीकरण मुलांनी इरमित्रीवर वृक्षरोपण केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व जे पालक विभाग प्रमुख इरमित्री कमिटीचे सभासद त्यांच्याबरोबर झाडे लावण्यासाठी येऊन मुलांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल धन्यवाद. तसेच डॅनियल मेस्त्री ह्यांनी आपल्या टेम्पोनी झाडे वर नेण्यासाठी विनामुल्य व जॅक्सन ह्यांनी आपली जे सी पी खड्डे मारण्यासाठी कन्सेशन रेटने दिली त्याबद्दल दोघांचे विशेष आभार. ह्याच दिवशी शेल्डन ह्यांनी फोटोग्राफी केली त्यांचे देखिल आभार.
१०) इरमित्री शेड पेंटींग करण्यासाठी कुणास टेंडर द्यावयाची असतील तर हा आठवडा शेवटचा आहे. आपल्या माहितीप्रमाणे कोण असेल तर त्यांना टेंडर त्वरीत द्यावयास कळविणे
११) सन २०२२ – २३ या वर्षासाठी इयत्ता ११ वि प्रवेशाचे अल्प संस्थाक कोट्याचे अर्ज संत जोजेफ जुनियर कॉलेज उत्तन मध्ये दिनांक २५ ते २६ जुलै २०२२ पर्यंत सुरु आहेत. वेळ सकाळी ८.०० ते १२.०० वाजेपर्यंत तरी १० वि उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत जुनियर कॉलेज कार्यालयाशी संपर्क साधावा.
१२) सोमवारी संध्याकाळच्या मिस्सानंतर कॅरसमॅटीक प्रार्थना असेल