रविवार दिनांक २७ मार्चच्या सूचना
- प्रायश्चित्त काळातील ४ था रविवार.
- आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता आनंदनगर गावपरिवाराने केली. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवाराचे असेल.
- येत्या शुक्रवारी संध्याकाळी इरमित्रीवर क्रुसाच्या वाटेच्या भक्तीचे आयोजन, सफाई व मिस्साचे आयोजन सेंट रॉक स्ट्रीट व संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवारांचे असेल.
- ह्या आठवड्यातील गावपारिवारांतील उपवासकालीन मिस्सा पुढीलप्रमाणे: सोमवारी फातिमा माता आनंदनगर गावपरिवार, मंगळवारी फातिमा माता समाज तलावली गावपरिवार, बुधवारी संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवार व गुरुवार वेलंकनी माता खाडीवर गावपरिवार.
- यंग बॉइस ऑफ डोंगरी तारोडी व इरमित्री कमिटीच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी बेलेन मावली चर्च ते इरमित्रीच्या डोंगरापर्यंत क्रुसाच्या वाटेच्या भक्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे. संध्याकाळी ७ वाजता हि भक्ती सुरु होईल. वर डोंगरावर पोचल्यावर मिस्सा, चहापाणी व येशूच्या दुःखसहनावर चित्रपट असेल. सर्वांना प्रेमाचे आमंत्रण. आयोजन करण्यासाठी आता पासाच्या भक्तीनंतर इरमित्री कमिटी व यंग बोईस ऑफ डोंगरी तारोडी पॅरिश ह्यांची संयुक्त सभा चर्च हॉलमध्ये घेण्यात येईल.
- आता पासाच्या भक्तीनंतर पॅरिश कौन्सिलच्या सभासदांची छोटीसी सभा मॅक्सि कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात येईल.
- प्रसेवकांनी आपापल्या गावपरिवारांतील घराबाहेर उतरू न शकणाऱ्या आजाऱ्या व्यक्तींची नावे बुधवारपर्यंत फादरांकडे द्यावीत. पुढील आठवड्यात फादर्स ह्या सर्व आजाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची कुंसारे ऐकतील.
- पासाच्या भक्तीनंतर संत व्हिन्सेंट डी पॉल संस्थेची सभा असेल.