रविवार दिनांक २० मार्चच्या सूचना
- प्रायश्चित्त काळातील ३ रा रविवार
- आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता समाज, तलावली गावपरिवाराने केली. पुढील रविवारी आयोजन व सफाई फातिमा माता आनंदनगर गावपरिवाराचे असेल.
- इरमित्रीवर शुक्रवारी ख्रुसाच्या वाटेच्या भक्तीचे आयोजन, चर्च सफाई व मिस्साचे आयोजन फातिमा माता लेन डोंगरी व फातिमा माता शांतीनगर गावपरिवारांनी केले. येत्या शुक्रवारी इरमित्रीवर ख्रुसाची वाट व मिस्सा होणार नाही.
- उद्यापासून आपण आपल्या धर्मग्रामात उपवासकालीन मिशन चालू करणार आहोत. रोज संध्याकाळी ७ वाजता मिस्सा, प्रवचन व साक्रामेंताची आराधना असेल. सर्वांनी कृपया उपस्थित राहावे हि विनंती. हे मिशन ऑनलाईन देखील दाखवले जाईल. त्यामुळे उद्यापासून ते शुक्रवारपर्यंत सकाळची मिस्सा हि ऑनलाईन नसेल.
- गुरुवारी व शुक्रवारी संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत उपवासकालीन कुंसारे असतील.
- शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी दूताचा मरीयेला संदेशाचा सण साजरा केला जाईल.
- प्रत्येक गावपरिवाराने नवीन ख्रिस्तशरीर प्रसेवक निवडावे हि विनंती. प्रसेवकांचा कालावधी फक्त एक वर्षासाठी असतो त्यामुळे त्याच प्रसेवकांना पुन्हा निवडायचे असेल तर मा. बिशपांची परवानगी घेणे गरजेचे आहे असे माननीय बिशपांनी पत्राद्वारे कळविले आहे.
- प्रेषितांची राणी संघ (स्टेला मारीस हॉस्पिटल सिस्टर्स) ह्यांनी इयत्ता नववी ते पंधरावीच्या मुलींसाठी इंग्लिश स्पिकिंग आणि व्यक्तिमत्व विकास शिबिरांचे आयोजन दिनांक १९ एप्रिल ते ३१ मे २०२२ ह्या कालावधीत वाडा येथे आयोजित केलेली आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्डावर दिलेल्या क्रमांकावर सिस्टरांशी संपर्क साधावा.