रविवार दिनांक ६ मार्चच्या सूचना

  1. प्रायश्चित्त काळातील १ ला रविवार
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराने केलेली. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवाराची असेल.
  3. इरमित्रीवर शुक्रवारी ख्रुसाच्या वाटेच्या भक्तीचे आयोजन, चर्च सफाई व मिस्साचे आयोजन सेंट जॉन बाप्टिस्ट मधला गावपरिवार व बेथलेहेम गावपरिवार तारोडी ह्यांनी केले. येत्या शुक्रवारी आयोजन व सफाई सेंट इग्नेशियस लोयोला धारावी व संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा गावपरिवाराचे असेल.
  4. सोमवारी संध्याकाळी फातिमा माता शांतीनगर, मंगळवारी संध्याकाळी सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी, बुधवारी संध्याकाळी बेथलेहेम गावपरिवार तारोडी, गुरुवारी संध्याकाळी सेंट जॉन बॅप्टिस्ट तारोडी व शनिवारी संध्याकाळी सेंट इग्नेशियस लोयोला धारावी गावपरिवारांत मिस्सा असतील.
  5. उपवासकालीन कार्यक्रमाच्या माहितीच्या दिलेल्या पत्रिकेमध्ये आज्ञा गुरुवार व शुभशुक्रवारच्या विधीच्या वेळा चुकीच्या दिलेल्या आहेत. आज्ञा गुरुवारची मिस्सा हि संध्याकाळी ७ वाजता असेल व शुभशुक्रवारी संध्याकाळी विधी ४.३० वाजता सुरु होईल ह्याची कृपया नोंद घ्यावी.
  6. आज संध्याकाळच्या पासाच्या भक्तीनंतर सुकाणू समितीची सभा असेल.
  7. फातिमा माता समाज तलावली गावपरिवारांची जनरल सभा मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता व  सेंट इग्नेशियस लोयोला धारावी व फातिमा माता आनंदनगर गावपरिवारांची जनरल सभा मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या ग्रोटोजवळ घेण्यात येईल. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती ह्या सभेस उपस्थित राहणे गरजेचे आहे.
  8. पॅरिस कौन्सिलची सभा शुक्रवार दिनांक ११ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता असेल.
  9. गुरुवार दिनांक १० मार्च रोजी इयत्ता १० वी, १२ वी, १५ वी व अन्य पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सकाळी ६ वाजता खास मिस्सा अर्पण केली जाईल.
  10. प्रेरणा सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्या पॅरिशमधील सर्व शेतकरी, बचत गट महिला, भाजीपाला विक्रेत्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला व रिक्षा चालक ह्या सर्वांना शासनाच्या व सरकारी बँकेच्या योजनांची माहिती देण्यासाठी  व फॉर्म भरण्यासाठी शुक्रवार दिनांक ११ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता काही व्यक्ती येतील. तरी जास्तीत जास्त लोकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.

Print your tickets