उपवासाविषयी देऊळमातेची मार्गदर्शक तत्वे

उपवासकाळातील प्रायश्चित्ताचे मार्ग

१. प्रार्थना

अ) मिस्साला जाणे

ब) ख्रुसाच्या वाटेची भक्ती करणे

क) अतिपवित्र साक्रामेंताला भेट देणे

ड) पवित्र शास्त्र वाचणे

इ) खाटेला खिळलेल्यांसाठी – प्रभूच्या दुःखसहनावर मननचिंतन करणे

२. प्रायश्चित्त

अ) एक जेवण न घेणे – नाश्ता, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण

ब) पूर्ण शाकाहारी जेवण घेणे – मासळी किंवा अंडीही न खाणे

क) दारू, सिगारेट व अन्य नशेपासून दूर राहणे

ड) पिक्चर, टीव्ही किंवा इतर करमणुकीच्या साधनांपासून दूर राहणे

३. दानधर्म

अ) दिवसाच्या कमाईतील १० टक्के दानधर्म करणे

ब) गरीब कुटुंबांना एक जेवण देणे

क) काही सामाजिक किंवा स्वयंसेवी कार्यास मदत करणे

ड) आजारी, वयोवृद्ध एकाकी जीवन जगणाऱ्यांना भेटी देणे

इ) रक्तदान करणे

ई) पर्यावरणाची काळजी घेणे – पायी, सायकल व सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे, कचरा, प्रदूषण न करणे

उपवासाबाबत मार्गदर्शक तत्वे:

१. राखेच्या बुधवारी व शुभशुक्रवारी उपवास करायचा असतो. काहीजण प्रत्येक शुक्रवारी उपवास करतात जे अध्यात्मिक जीवनासाठी चांगले आहे

२. १८ ते ६० वयोगटांतील सर्वांना उपवासाचा नियम लागू आहे

३. जे उपवास करतात ते दिवसाला एक पूर्ण जेवण घेऊ शकतात. सकाळी एकदम कमी नाश्ता व रात्री एकदम कमी जेवण घेऊ शकतात. किंवा सकाळी कमी नाष्टा, दुपारी कमी जेवण व रात्री पूर्ण जेवण घेऊ शकतात.

४. आरोग्याच्या किंवा कामाच्या कारणामुळे जे उपवास करू शकत नाही त्यांना माफी आहे. परंतू क्षुल्लक कारणावरून उपवास न करणे चुकीचे आहे. उपवासाने आपण प्रभूच्या दुःखसहन व मरणाशी एकरूप होत असतो. जे उपवास करू शकत नाही त्यांना प्रमूख धर्मगुरू सूट देऊ शकतात.    

पश्चाताप करा व प्रभूकडे वळा!

Print your tickets