रविवार दिनांक २७ फेब्रुवारीच्या सूचना
- सामान्य काळातील ८ वा रविवार.
- आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई बेथलेहेम गावपरिवार, तारोडी ह्यांनी केली. पुढील रविवारी चर्च सफाई व मिस्साचे आयोजन वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराचे असेल. पुढील रविवारी सकाळी ७.३० वाजता एकच मिस्सा असेल. संध्याकाळी ५ वाजता मिस्सा व पासाची भक्ती असेल. उपवासकाळात संध्याकाळची मिस्सा व पासाची भक्ती ऑनलाईन देखील असेल.
- शुक्रवारी इरमित्रीवर आयोजन व सफाई वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराने केली. येत्या शुक्रवारी चर्च सफाई, ख्रुसाच्या वाटेच्या भक्तीचे व मिस्साचे आयोजन बेथलेहेम गावपरिवार तारोडी व सेंट जॉन बॅप्टिस्ट मधल्या गावपरिवाराचे असेल.
- शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता इरमित्रीच्या पायथ्यापासून वर डोंगरमाथ्यापर्यंत ख्रुसाच्या वाटेची भक्ती व तदनंतर मिस्सा असेल. जास्तीत जास्त भाविकांनी ह्या भक्तीत सहभागी व्हावे हि विनंती.
- बुधवार दिनांक २ मार्च हा राखेचा बुधवार. त्यादिवशी सकाळी ६ व ७ वाजता अश्या दोन मिस्सा असतील व संध्याकाळी ६ वाजता मिस्सा असेल. राखेला आशीर्वाद सकाळी ६ च्या मिस्सावर दिला जाईल. सकाळी ६ ची मिस्सा ऑनलाईन देखील असेल. जे आजारी आहेत व घराबाहेर उतरू शकत नाहीत त्यांनी ऑनलाईन मिस्सा ऐकावी व तदनंतर कुटुंबीयांनी त्यांच्या कपाळाला राख लावावी.
- गुरुवार दिनांक ३ मार्च रोजी संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा आरीवर गावपरिवारात व शनिवार दिनांक ५ मार्च रोजी फातिमा माता लेन डोंगरी गावपरिवारात संध्याकाळी ७.३० वाजता उपवासकालीन मिस्सा असतील. गावपरिवारातील उपासकालीन मिस्सानंतर फादर त्या त्या गावपरिवाराची जनरल सभा घेतील.
- शनिवारी संध्याकाळी चर्चमध्ये मिस्सा होणार नाही.
- उपवासकालीन कार्यक्रमाची माहिती देणारे पत्रक प्रत्येक कुटुंबाला देण्यात येईल. कृपया आपापल्या विभागप्रमुखाशी किंवा सेवकनेत्यांशी संपर्क साधावा.
- ज्यांना ह्यावर्षी वेरॉनिका व मेरी माग्दालिनची भूमिका घ्यायची असेल त्यांनी ६ मार्चपर्यंत चर्च कार्यालयात नावे द्यावीत.
- रविवार दिनांक ०६ मार्च रोजी संध्याकाळच्या पासानंतर सुकाणू समितीची सभा असेल. प्रत्येक विभागातील सुकाणू समिती सभासदांनी कृपया हजर राहावे
- बुधवार दिनांक २ मार्च रोजी संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवाराची जनरल सभा संध्याकाळी ७.३० वाजता व आज संध्याकाळी ४.३० वाजता वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराची जनरल सभा असेल. फादर ह्या सभेला उपस्थित राहतील.
- सर्वांनी आपापली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरावी असे आवाहन महानगर पालिकेमार्फत करण्यात आलेले आहे.
- आज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वयोगटातील बालकांसाठी पोलियोचे डोसेस लसीकरण केंद्रावर उपलब्ध असतील.
- सोमवारी संध्याकाळी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेसाठी फा. फिलिप डिसोजा येतील.