रविवार दिनांक १३ जानेवारीच्या सूचना
- सामान्य काळातील ६ वा रविवार. आता एसव्हीपीसाठी दुसरे दान गोळा केले जाईल.
- आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत इग्नेशियस लोयोला धारावी गावपरिवाराने केली. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत जॉन बॅप्टिस्ट मधल्या गावपरिवाराचे असेल.
- आज इरमित्रीवर आयोजन व सफाई फातिमा माता समाज तलावली गावपरिवाराने केली. येत्या शुक्रवारी आयोजन व सफाई संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवाराचे असेल.
- पुढील रविवारी सकाळी ८.४५ ची मिस्सा हि लग्नाची मिस्सा असल्याने मराठीत असेल.
- गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता खाडीवर चॅपेलमध्ये मिस्सा असेल.
- प्रथम ख्रिस्तशरीर संस्काराचे फोटोज चर्च कार्यालयातून घ्यावेत. ज्यांना पेन ड्राईव्ह मध्ये हवे असतील त्यांनी पेन ड्राईव्ह घेऊन यावे.
- कार्मेल कॉन्व्हेंट प्री प्रायमरी शाळेत २०२२ २०२३ ह्या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी, जुनियर व सिनियर के जीसाठी ऍडमिशन चालू आहे. इच्छुकांनी सकाळी ११.३० ते १२.३० च्या दरम्यान शाळेशी संपर्क साधावा.
- मिरा भायंदर महानगरपालिकेने सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा कर भरणा करणे करिता अभय योजना लागू केलेली आहे. सदर अभय योजना दि. ०१/०२/२०२२ ते १५/०३/२०२२ पर्यंत आहे. मालमत्ता धारकांनी संपूर्ण एक रकमी कराचा भरणा केल्यास व्याज रक्कमेत ७५% माफी देण्यात येत आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे.
- कृपया आपापला समाज कल्याण निधी वेळेवर भरावा हि नम्र विनंती.