रविवार दिनांक १६ जानेवारीच्या सूचना!
- सामान्य काळातील दुसरा रविवार. आपल्या पॅरिशची आश्रयदाती बेलेन मावलीचा सण. सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा
- आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई पॅरिश कौन्सिलच्या सभासदांनी केले. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारणारे मुलंमुली व त्यांचे पालक करतील.
- पुढील रविवारी आपल्या धर्मग्रामात प्रथम ख्रिस्तशरीरसंस्कार असल्याने सकाळी ६ वाजता पहिली मिस्सा व सकाळी ८.३० वाजता प्रथम ख्रिस्तशरीर संस्काराची मिस्सा असेल. शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ७ वाजता रविवारची मिस्सा असेल.
- उद्या संध्याकाळी ५.५० वाजता बावटा उतरविला जाईल व ६ वाजता आभाराची मिस्सा असेल. मिस्साचे आयोजन आपले गायन मंडळ करील.
- मंगळवार दिनांक १८ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत आपण ख्रिस्ती ऐक्य सप्ताह साजरा करीत आहोत. सर्व ख्रिस्ती लोकांमध्ये ऐक्य नांदावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करणार आहोत.
- उद्यापासून रोज संध्याकाळी ७ वाजता यंदा प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारणाऱ्या मुलामुलींची प्रॅक्टिस असेल. फादर स्वतः हि प्रॅक्टिस घेतील. सर्व मुलामुलींनी हजर राहावे.
- शुक्रवार दिनांक २१ जानेवारी रोजी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारणाऱ्या मुलामुलींच्या पालकांचे कुंसार असेल व तदनंतर त्यांची प्रॅक्टिस असेल.
- शुक्रवारी इरमित्रीवर मिस्सा होणार नाही.
- गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता वेलंकनी माता खाडीवर चॅपेलमध्ये मिस्सा असेल.
- उद्या चर्च कार्यालय बंद राहील.
- उत्तन चर्चचे प्रमूख धर्मगुरु फादर पीटर डीकुन्हा ह्यांनी कळविल्याप्रमाणे ह्यापुढे वेलंकनी माता तीर्थमंदिर भाटेबंदर येथे प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे नियमित मिस्सावर लग्नसंस्कारास परवानगी दिली नाही व त्यासाठी फक्त खास मिस्सा ठेवावी लागेल. तेथे लग्न करू इच्छिणाऱ्यांस तीर्थमंदिराला रु. १०,०००/- देणगी स्वरूपात द्यावे लागतील. भाविकांनी ह्याची नोंद घ्यावी.