रविवार दिनांक ०९ जानेवारी २०२२ च्या सूचना

  1. प्रभू येशूच्या बाप्तिस्माचा सण व आपल्या पॅरिशची आश्रयदाती बेलेन मावली हिच्या नोव्हेनाचा ३ रा दिवस. आता एसव्हीपीसाठी दुसरे दान घेण्यात येईल. 
  2. उद्यापासून आपण उपासनेतील सामान्य काळाला सुरुवात करीत आहोत. आपापल्या घरातले व गावपरिवारातले नाताळ गोठे आपण काढू शकता.
  3. उद्या सोमवार असला तरी नोव्हेना चालू असल्याने सकाळी ५.३५ वाजता रोझरी व तदनंतर मिस्सा व नोव्हेना असेल. संध्याकाळी नेहमीप्रमाणे नोव्हेनाची मिस्सा असेल.
  4. पुढील रविवारी आपण आपल्या धर्मग्रामाची आश्रयदाती बेलेन मावलीचा सण म्हणजेच आपल्या पॅरिशचा सण साजरा करीत आहोत. त्यादिवशी सकाळी ६ वाजता पहिली मिस्सा व ८ वाजता सणाची मिस्सा असेल. मिस्साचे आयोजन व चर्च सफाई पॅरिश कौन्सिलचे सभासद करतील.
  5. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण बेथलेहेम फेस्त व सहभोजन पुढे ढकललेले आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे सध्या फक्त अत्यावश्यक कामासाठीच फादरांना भेटायला यावे हि विनंती. भेटायला येण्यापूर्वी फादरांना फोन करावा.
  6. पुढील रविवारी पाचारण रविवार म्हणून देखील साजरा  केला जाईल. प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यास अधिकाधिक तरुण तरुणींनी पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  7. ह्या वर्षांपासून समाज कल्याण निधी हा मासिक रु. १००/- केलेला आहे. सर्वांनी समाज कल्याण निधी भरून सहकार्य करावे हि विनंती.  

Print your tickets