रविवार दिनांक ०२ जानेवारीच्या सूचना!
- प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता शांतीनगर गावपरिवाराने केली. पुढील रविवारी आयोजन व सफाई ज्यांचा नोव्हेना असेल त्यांचे असेल. पुढील रविवारी आपण प्रभू येशूच्या बाप्तिस्माचा सण साजरा करीत आहोत.
- शुक्रवार दिनांक ०७ जानेवारीपासून आपण आपल्या धर्मग्रामाची आश्रयदाती बेलेन मावलीच्या सणाच्या तयारीसाठी नोव्हेना सुरु करीत आहोत. रोज सकाळी ६ वाजता मिस्सा व नोव्हेना व संध्याकाळी ६.३० वाजता रोझरी, बावटा, मिस्सा, प्रवचन व नोव्हेना असेल. संध्याकाळची मिस्सा ऑनलाईन देखील असेल. सर्व भाविकांनी सहभागी होऊन आपल्या देवळाच्या सणाची योग्य तयारी करावी हि विनंती.
- नोव्हेनाचे आयोजन, विषय व प्रवचनकारांची यादी नोटीस बोर्डावर लावली जाईल. कृपया ती पाहून योग्य तयारी करावी.
- गुरुवार दिनांक ०६ जानेवारीला वेलंकनी माता खाडीवर चॅपेलमध्ये संध्याकाळी ७ वाजता मिस्सा असेल.
- पुढील रविवारी नोव्हेना असल्याने सकाळी ७.३० वाजता एकच मिस्सा असेल व संध्याकाळी ७ वाजता नोव्हेनाची मिस्सा असेल. शनिवारी संध्याकाळची मिस्सा हि शनिवारची मिस्सा असेल.
- सणाच्या दिवशी, म्हणजेच १६ जानेवारीला संध्याकाळी आपण बेथलेहेम फेस्त साजरा करणार आहोत ज्यामध्ये खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व सहभोजन असेल. आयोजन आपली युवक संघटना करील. सहभोजनासाठी कुपन्स आपापल्या विभागप्रमुखांकडून विकत घ्यावेत. तसेच विभागांनी १० ते १२ मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम तयार करावा हि विनंती.
- बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी पॅरिश कौन्सिलची सभा घेण्यात येईल.
- भायंदर डिनरी मार्फ़त आयोजित केलेल्या गोठा स्पर्धेत आपल्या युवक संघटनेला प्रथम बक्षिस व स्टार स्पर्धेत दुसरे बक्षीस मिळालेले आहे. युवक संघटनेचे अभिनंदन.
- मीरा भायंदर महानगर पालिकेमार्फत १५ ते १८ वयोगटांतील मुलामुलींसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम आपल्या शाळेत सोमवार दिनांक ३ जानेवारी रोजी आयोजित केलेली आहे. कृपया ह्याचा लाभ घ्या.
- पुढील रविवारी स्व. अंतोन जॉव मेंडोन्सा ह्यांची वार्षिक स्मृतिदिनाची मिस्सा असेल.