- आगमन काळातील तिसरा रविवार. आता एसव्हीपीसाठी दुसरे दान गोळा केले जाईल.
- आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता आनंदनगर गावपरिवारने केली. पुढील रविवार आयोजन व सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवाराची असेल.
- इरमित्रीवर शुक्रवारी मिस्साचे आयोजन व सफाई सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी गावपरिवाराने केली.
- उद्या/सोमवारी १३ तारीख, फातिमा मातेचा दिवस. उद्या/सोमवारी संध्याकाळी ६ वाजता इरमित्रीवर खास मिस्सा व तदनंतर पालखी असेल. मिस्साचे आयोजन व सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवाराची असेल.
- सोमवारी इरमित्रीवर मिस्सा असल्याने इथे मुख्य देवळात मिस्सा होणार नाही व शुक्रवारी इरमित्रीवर मिस्सा नसेल. उद्या सोमवारी ऑनलाईन मिस्सा होणार नाही.
6. संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा आरीवर गावपरिवाराची जनरल सभा शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या ग्रोटोजवळ घेण्यात येईल. संत रॉक स्ट्रीट डोंगरी व फातिमा माता समाज तलावली गावपरिवाराची जनरल सभा मंगळवार दिनांक १४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता असेल.