रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ च्या सूचना!

  1. आगमन काळातील पहिला रविवार.
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता समाज तलावली गावपरिवाराने केली. येत्या रविवार मिस्साचे आयोजन व सफाई संत फ्रान्सिस झेवियर, पालखाडी गावपरिवाराचे असेल.
  3. येणारा शुक्रवार हा महिन्याचा पहिला शुक्रवार असल्याने इरमित्रीवर मिस्सा होणार नाही. येथे मुख्य देवळात संध्याकाळी ६ वाजता अतिपवित्र सॅक्रामेंताची आराधना व तदनंतर मिस्सा असेल. आराधनेचे आयोजन स्त्रियांची सोड्यालीटी व लीजन ऑफ मेरीचे सभासद करतील.
  4. मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी संत अँड्रू, प्रेषित ह्यांचा सण व शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी संत फ्रान्सिस झेवियरचा सण साजरा केला जाईल.
  5. शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी संत फ्रान्सिस झेवियर, पालखाडी गावपरिवार आपल्या आश्रयदात्याच्या सण साजरा करीत आहेत. त्यादिवशी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांच्या चॅपेलमध्ये सणाची मिस्सा असेल. सर्वांना प्रेमाचे आमंत्रण.
  6. पुढील रविवारी सकाळी ८.४५ वाजता लग्नाची मिस्सा असल्याने मिस्सा मराठीत असेल.
  7. यंदा आपण विभागवार गोठा व स्टार कॉम्पिटिशन घेणार आहोत. गोठ्यासाठी विषय आहे “महामारीत ख्रिस्तावरील श्रद्धा आमचा आधार”. स्टारचा विषय ओपन राहील. अधिक सविस्तर माहिती पॅरिश कौन्सिल मेम्बर्सना दिली जाईल.
  8. सोमवार दिनांक ६ डिसेंबर रोजी माननीय बिशप बार्थोल बॅरेटो आपल्या धर्मग्रामाला पाळकीय भेट देतील. त्यादिवशी ते पॅरिश कौन्सिल, फायनान्स व प्रॉपर्टी कमिटी व युवक संघटनेची सभा घेतील. वेळा पुढील रविवारी कळवल्या जातील.
  9. आज संध्याकाळी ५ वाजता वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराची व मंगळवारी रात्री ८ वाजता आनंदनगर गावपरिवाराची जनरल सभा असेल. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती ह्या सभेला हजर राहणे गरजेचे आहे.
  10. मुक्तिसागर प्रबोधन केंद्राने प्रकाशित केलेली बायबल दैनंदिनी विक्रीसाठी उपलब्ध आहे. हि आपल्या मुंबई सरधर्मप्रांताची अधिकृत मराठी बायबल डायरी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ती घ्यावी हि विनंती.
  11. मागील रविवारचे दान रु. ११,५०१/-, इरमित्रीसाठी देणगी रु. ५,०००/- देणार फिलिप इनास फर्नांडिस, वसई, समाज कल्याण निधी रु. ६००/- देणार संत गोन्सालो गार्सीया गावपरिवार, कुंभारवाडा, वेदिसाठी फुले देणार क्लेरिसा व ली.
  12. येत्या बुधवारी सकाळी ६ वाजता स्व. निकलस इनास घर्शी व संध्याकाळी ६ वाजता स्व. मेरी इमानुएल ह्यांच्या सातव्याची मिस्सा व येत्या रविवारी सकाळी ७.३० वाजता स्व. मॅटिव्ह अंतोन मुनीस ह्यांच्या वार्षिक स्मृतिदिनाची मिस्सा असेल.

Print your tickets