रविवार दिनांक १४ नोव्हेंबरच्या सूचना

  1. सामान्य काळातील ३३ वा रविवार
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई बेथलेहेम गावपरिवार, तारोडी, ह्यांनी केले. येत्या रविवारी चर्च सफाई व मिस्साचे आयोजन वेलंकनी माता, खाडीवर गावपरिवाराचे असेल.
  3. इरमित्रीवर १३ तारखेला आयोजन व सफाई फातिमा माता लेन, डोंगरी गावपरिवाराने केली. येत्या शुक्रवारी ईरमित्रीवर मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता शांतीनगर गावपरिवाराचे असेल.
  4. येत्या रविवारी आपण ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहोत. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता व रविवारी सकाळी ६, ७.३० वाजता मराठी व ८.४५ वाजता इंग्रजी मिस्सा असतील. इंग्रजी मिस्सानंतर संध्याकाळपर्यंत अतिपवित्र साक्रामेंताची आराधना गावपरिवारांतर्फे करण्यात येईल. संध्याकाळी अतिपवित्र साक्रमेंताची मिरवणूक असेल. अधिक माहिती पुढील रविवारी देण्यात येईल व आपल्या वेबसाइट वर टाकण्यात येईल.
  5. गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी वेलंकनी माता चॅपल खाडीवर येथे संध्याकाळी ७.३० वाजता मिस्सा असेल.
  6. शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा गावपरिवाराची जनरल सभा असेल. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती ह्या सभेस हजर राहणे कंपलसरी असेल.  
  7. प्रेषितांच्या विश्वसंगीकारावर आधारित “मी श्रद्धा ठेवितो” हे फादर संदीप कोशाव ह्यांचे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत रु. ८०/- मात्र. इच्छुकांनी चर्च कार्यालयातून घेऊन जावे.
  8. ब्र. मेलबॉर्न पोशापीर आजपासून दर शनिवार रविवार युवकार्यासाठी आपल्या पॅरिश मध्ये येणार आहेत. त्यांचे स्वागत! युवकांनी त्यांच्या संपर्कात राहून कार्य करावे हि विनंती.
  9. फादर बोनाव्हेंचर जनजागृती संघातर्फे आज दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कॅरम कॉम्पेटीशन चर्च हॉलमध्ये घेण्यात येईल. १० गावपरिवार ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्वांना आमंत्रण!
  10. विवाहाच्या घोषणा ह्यापुढे आपल्या चर्चच्या वेबसाईटवर देखील टाकल्या जातील. त्याचप्रमाणे सर्व महत्वाच्या सूचना व आठवड्यातील कार्यक्रम आपल्या वेबसाईट वर टाकले जातात. कृपया त्याचा लाभ घ्यावा.
  11. आज सकाळी ८.४५ च्या मिस्सानंतर संडे स्कुल शिक्षकांतर्फे बालक दिवस साजरा केला जाईल.
  12. चर्चच्या घाटासाठी नेमलेल्या समितीची सभा बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता असेल.

Print your tickets