रविवार दिनांक २१ नोव्हेंबरच्या सूचना

  1. सामान्य काळातील शेवटचा रविवार. ख्रिस्तराजाचा सण. सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई वेलंकनी माता खाडीवर गावपरिवाराने केली. येणाऱ्या रविवारी आयोजन व सफाई फातिमा माता समाज तलावली गावपरिवाराचे असेल.
  3. आज संपूर्ण दिवस अतिपवित्र साक्रामेंताची आराधना असेल. वेळा नोटीस बोर्डावर व आपल्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. प्रत्येक गावपरिवारांनी आपापल्या वेळेत येऊन साक्रामेंताची आराधना करावी हि विनंती.
  4. संध्याकाळी ५ वाजता चर्चच्या आवारात मिरवणूक असेल व तदनंतर प्रवचन व आशीर्वाद असेल.
  5. पुढील रविवारपासून आपण आगमन काळाला सुरुवात करीत आहोत.
  6. उद्या संध्याकाळी मिस्सानंतर पवित्र आत्म्याची प्रार्थना असेल.
  7. बुधवार दिनांक २४ नोव्हेंबरपासून संत फ्रान्सिस झेवियर चॅपल पालखाडी येथे संत फ्रान्सिस झेवियरच्या सन्मानार्थ नोव्हेनाला सुरुवात करीत आहोत. रोज संध्याकाळी ७ वाजता रोझरी, ७.३० वाजता मिस्सा, प्रवचन व नोव्हेना असेल. सर्वांना प्रेमाचे आमंत्रण!
  8. बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी फातिमा माता लेन, डोंगरी गावपरिवाराची व गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी फातिमा माता शांतीनगर गावपरिवाराची जनरल सभा रात्री ८ वाजता घेण्यात येईल. फादर ह्या सभेला उपस्थित असतील. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती ह्या सभेला हजर राहणे गरजेचे आहे.
  9. युवक संघटनेची सभा रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ च्या मिस्सानंतर घेण्यात येईल.
  10. डोंगरी गावमंडळाची जनरल सभा रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गावकीच्या सभागृहात संपन्न होईल. सर्व ग्रामस्थांनी कृपया उपस्थित राहावे.
  11. बँक ऑफ बरोडा, देना बँक तर्फे त्यांच्या ग्राहकांसाठी खास मेडिक्लेम पोलिसी सुरु करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पाहावा.
  12. पुढील रविवारी स्व.स्टिफन रॉड्रिग्ज ह्यांची वार्षिक मिस्सा असेल.

Print your tickets