रविवार दिनांक ०५ डिसेंबरच्या सूचना!

  1. आगमन काळातील २ रा रविवार
  2. आज मिस्साचे  आयोजन व चर्च सफाई संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवाराने केली. येत्या रविवारी आयोजन व सफाई फातिमा माता आनंदनगर गावपरिवाराची असेल.
  3. ईरमित्रीवर शुक्रवारी आयोजन व सफाई सेंट रॉक स्ट्रीट, डोंगरी गावपरिवाराचे असेल.
  4. गुरुवारी डिनरी मिटिंग असल्यामुळे पालखाडीत मिस्सा होणार नाही.  
  5. बुधवार दिनांक ८ डिसेंबर रोजी माता मरीयेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा सण साजरा केला जाईल. त्यादिवशी सकाळी मिस्साचे आयोजन स्त्रियांची सोड्यालीटी व लीजन ऑफ मेरीचे सभासद करतील.
  6. बुधवार दिनांक ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पॅरिश कौन्सिलची सभा असेल.
  7. उद्या/सोमवारी माननीय बिशप बार्थोल आपल्या धर्मग्रामाला पाळकीय भेट देतील. दुपारी ३.३० ते ४ वाजेपर्यंत सिस्टरांच्या कॉन्व्हेंटला भेट देतील. ४ ते ५.३० वाजेपर्यंत धर्मग्रामातील काही कुटुंबांना भेटी देतील. संध्याकाळी ६ वाजता युवक संघटनेची सभा असेल, ६.३० वाजता पॅरिश फायनान्स व प्रॉपर्टी कमिटीची सभा असेल व संध्याकाळी ७ वाजता पॅरिश कौंसिलसोबत बिशप सभा घेतील. हि बिशपांची अधिकृत भेट असल्याने सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे हि विनंती.
  8. लग्नाच्या मिस्साच्या नंतर चर्च आवारात फटाके फोडण्यास मनाई आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी वधूवरांनी सकाळी मिस्साला उपस्थित राहून कुंसार करायचे असते ह्याची पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत.  
  9. रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता स्व. कत्रीन लुईस ग्रेशियस ह्यांच्या वार्षिक स्मृतिदिनाची मिस्सा असेल.

Print your tickets